एसटी बसेसची सेवा उद्यापासून बंद, अनिल परब यांची माहिती

एसटी बसेसची सेवा उद्यापासून बंद, अनिल परब यांची माहिती

Published by :
Published on

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे सत्र सुरू होते. या संकटाच्या काळात एसटी महामंडळाने तसेच कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले. लॉकडाऊनमुळे लोकल सर्वसामन्य लोकांसाठी बंद आहे. बेस्ट सोबतच एसटी महामंडळाच्याही काही गाड्या धावत होत्या. आता या गाड्यांची सेवा 14 जूनपासून थांबवण्यात येत आहे. तसे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

अनिल परब यांनी ट्वीट करत सांगितले की, महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती.याचा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी बेस्टच्या साथीला एसटी बसेस मुंबईत धावत होत्या.यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महामंडळाचे कर्मचारी सेवा देत होते.सर्व चालक, वाहक व व्यवस्थेतील कर्मचारी अधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले. तुमच्या अशा सेवेमुळेच एस. टी. चा सन्मान व विश्वास आजही टिकून आहे असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com