संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

राज्यात तीन लाख किलो डाळ सडली… शासनाच्या गोदामांचे सत्य उघड

Published by :
Published on

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कडक निर्बंध लागू केलेत. यासोबतच गरजुंसाठी निधी आणि मोफत धान्य देण्याचीही घोषणा केलीय. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी गरजुंना मदतीचा हात दिलेला असला तरी केवळ शासननिर्णय न झाल्यानं लाखो किलो धान्य सडून गेल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहेत.

गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमधील 3 लाख किलो डाळ पडून असल्याचे समोर आले आहे. १५ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी मोफत तांदूळ आणि गहू देण्याची घोषणा केलीय. पण हे धान्य गरिबांच्या ताटात पडणार का हा खरा प्रश्न आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये आलेल्या तब्बल 3 लाख किलो हरभरा डाळीचे वाटप झाले नसल्याचा आरोप भाजपाचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. कोटेचा यांनी मुलुंडमधील एका शिधावाटप केंद्रात जाऊन याची पोलखोल केलीय. या एकाच दुकानात अशी अठराशे किलो डाळ सडत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह देशभरात गोरगरीब जनतेला मोफत वाटण्यासाठी धान्य पाठवलं. प्रति कुंटुंबाला 1 किलो चणाडाळ वाटण्यासाठी लाखो किलो हरभरा डाळही पाठवली. पण लालफितीचा कारभार आडवा आला. डाळीचं खापर राज्य सरकारनं केंद्रावरच फोडलंय. डाळीचं वाटप का झालं नाही, याबद्दल अजब युक्तिवाद अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com