…तर सीबीआयवर आम्ही केस करू; अनिल देशमुखांच्या वकीलाची ‘लोकशाही’ला दिली माहिती

…तर सीबीआयवर आम्ही केस करू; अनिल देशमुखांच्या वकीलाची ‘लोकशाही’ला दिली माहिती

Published by :
Published on

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.वरळीतील सुखदा येथून गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचा आरोपच राष्ट्रवादीतून होत आहे. दरम्यान अनिल देशमुखांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी सीबीआयने जर ताब्यात घेतले असेल तर सीबीआयवर आम्ही केस करू, अशी भूमिका लोकशाही न्यूजला दिली. यावर आता सीबीआय काय प्रतिक्रीया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांच्यासह वकील आनंद डागा याना सीबीआयने ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे ते गाडीतून जात असताना गाडी थांबवली आणि सीबीआयची टीमने वरळीतील सुखदा येथून गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांना याआधी कोणतेही समन्स बजावलं नव्हतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com