…म्हणून असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सोलापूर शहर वाहतूक शाखेची कारवाई

…म्हणून असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सोलापूर शहर वाहतूक शाखेची कारवाई

Published by :
Published on

सोलापूर | एमआयएम पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेल्या पक्षप्रमुख असदुद्दिन ओवेसी यांच्यावर सोलापूर शहर वाहतूक शाखेने कारवाई करत दंड आकारला आहे. सोलापूरमध्ये प्रवेश करताना विना नंबर प्लेटच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर शहर वाहतूक शाखेनं त्यांच्या गाडीवर ही कारवाई करत दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नेमकं घटना काय? :
● सोलापूरमध्ये आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हैदराबादहून सोलापूरमध्ये आले होते

● त्यावेळी त्यांनी हैदराबाद नाका ते सोलापूर शासकीय विश्रामगृहापर्यंतचा प्रवास विना नंबर प्लेटच्या गाडीतून केला. त्यामुळे त्यांच्या गाडीवर सोलापूर शहर वाहतूक शाखेनं दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com