मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्या दिवसांत भरपगारी सुट्टी देण्याची काही गरज नाही : स्मृती इराणी

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्या दिवसांत भरपगारी सुट्टी देण्याची काही गरज नाही : स्मृती इराणी

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीबाबत एक वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीबाबत एक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी भारतातील मासिक पाळी धोरणाबाबत एक प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाचे उत्तर देताना स्मृती इराणी यांनी एक वक्तव्य केलं. स्मृती इराणी म्हणाल्या की, “एक मासिक पाळी येणारी स्त्री म्हणून मी सांगू शकते की, मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, हा स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही त्यासाठी भरपगारी सुट्टीच्या कोणत्याही विशिष्ट धोरणाची हमी देऊ नये.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मासिक पाळी येणाऱ्या महिलेचं अगदी साध्या कामातील स्वातंत्र्य सुद्धा यामुळे कमी होतं ज्याचा दुरगामी परिणाम त्यांच्यावरील सामाजिक बहिष्कार व अत्याचार या स्वरूपात दिसून येऊ शकतो. सर्व कामाच्या ठिकाणी भरपगारी मासिक पाळीच्या रजेची अनिवार्य तरतूद करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. मासिक पाळीचा प्रश्न आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींबाबत मौन पाळलं जातं. अनेकदा महिलांना लज्जास्पद वागणूक दिली जाते. त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते किंवा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जातो. असे स्मृती इराणी म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com