कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण; कोल्हापुरात ‘निर्भय मॉर्निंग वॉक’

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण; कोल्हापुरात ‘निर्भय मॉर्निंग वॉक’

Published by :
Published on

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्याने आज कोल्हापुरात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला. यामध्ये सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॉम्रेड पानसरे यांचे स्नेही कॉ. सुरेश शिपुरकर , मेघा पानसरे, उमा पानसरे तसेच ज्येष्ठ विचारवंत यामध्ये सहभागी झाले होते. पानसरे यांच्या निवासस्थानापासून हा मॉर्निंग वॉक काढण्यात आला. दरम्यान घरासमोरच कॉ.गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एसआयटीने गतीने केला. त्यांच्या तपासामुळे दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येतील काही महत्त्वाचे धागेदोरे हाती आले. असाच तपास महाराष्ट्र एसआयटीने करावा. तपास यंत्रणांनी अधिक गतीने तपास करून विवेकवादाची मुळाशी गेले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

सध्या या हत्येचा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षे झाल्यानंतरही पोलीस अद्याप खुनाचा तपास करत आहेत. तरीही त्यांना मुख्य सूत्रधार असणारे मारेकरी सापडत नाहीत. ही निषेधाची बाब आहे, असं मेघा पानसरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान. सरकारने या खुनाचे मारेकरी शोधण्यासाठी पूर्णवेळ काम करणारी यंत्रणा उभी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com