पुण्यात स्कूल बसमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातून धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात स्कूल बसमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये 45 वर्षीय बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केला आहे.
अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या 4 दिवसांपासून बस चालक अत्याचार करत होता अशी माहिती मिळत आहे.
बस चालक सहा वर्षीय चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार करत होता. बदलापूरच्या घटनेनंतर आता पुण्यातील धक्कादायक प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी बस चालकाने आणखी काही मुलींवरही अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्याच्याबद्दलची चौकशी मी पत्रकार परिषद संपल्यावर करेन आणि जी काही पुढची कडक अॅक्शन असेल ती मी करायला सांगेन. असे अजित पवार म्हणाले.