‘गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा’

‘गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा’

Published by :
Published on

भाजपा नेते गणेश नाईक यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. गणेश नाईक यांनी नुकतंच एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'कोणालाही गुंडांबाबत काही समस्या असल्यास मला कधीही सांगा. मला आंतरराष्ट्रीय डॉन ओळखतात', असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं होतं.

वाशी इथं राष्ट्रावादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सुळे बोलत होत्या. महाराष्ट्रातील भाजपा आमदाराचे संबंध अशाप्रकारे अंडरवर्ल्ड डॉनसोबत असतील तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीनं चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदीय अधिवेशनात हा विषय मांडणार असून त्यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com