अंगारकी चतुर्थीला घेता येणार नाही सिद्धीविनायकाचे दर्शन

अंगारकी चतुर्थीला घेता येणार नाही सिद्धीविनायकाचे दर्शन

Published by :
Published on

महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी पुन्हा एकदा भीतीदायक स्वरुप घेऊ लागली आहे. परिणामी लॉकडाऊन संपल्यानंतर सुरू करण्यात आलेली सार्वजनिक ठिकाणं पुन्हा एकदा बंद होणार की काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. विविध मंदिरांमध्ये देखील पुन्हा एकदा निर्बंध लादण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या नियमांचे पालन करणे आवश्यक झालेच आहे.

या दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावेळी मंदिर प्रशासनाने अंगारकी चतुर्थी दिवशीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अशा भाविकांनाच प्रवेश असणार आहे, ज्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे शिवाय ज्यांच्याकडे या रजिस्ट्रेशनचा क्यूआर कोड (QR Code) आहे.

2 मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. यादिवशी कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता भाविकांच्या दर्शनावर निर्बंध आणले आहेत. ज्यांना दर्शनाची परवानगी आहे, त्यांना देखील सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यानच दर्शन घेता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com