Video : सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाच सेकंदात जमीनदोस्त; पण का?

सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला अखेर प्रशासनाने जमीन दोस्त केलेलं आहे. या कारखान्याची चिमणी पाच सेकंदात खाली पाडण्यात आले आहे.

सोलापूर : सोलापूरच्या विमान सेवेला अडथळा असणाऱ्या सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला अखेर प्रशासनाने जमीन दोस्त केलेलं आहे. या कारखान्याची चिमणी पाच सेकंदात खाली पाडण्यात आले आहे. यानंतर सिद्धेश्वर कारखान्याच्या कारखाना परिसरात शांततापूर्वक वातावरण आहे. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

सोलापूर महानगरपालिकेने 45 दिवसात चिमणी पाडून घेण्याची आदेश कारखान्याच्या प्रशासनाला दिले होते. मात्र कारखाना प्रशासनाकडून चिमणी पाडण्यात न आल्याने पालिकेच्या प्रशासनाकडून आज चिमणी पाडण्यात आलेले आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याची ही चिमणी 92 मीटरची होती. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद संख्यासह नोकरवर्ग मोठा आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com