खासदारांबद्दल चुकीची पोस्ट व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात पोलिस अँक्शन मोडमध्ये

खासदारांबद्दल चुकीची पोस्ट व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात पोलिस अँक्शन मोडमध्ये

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करीत ही पोस्ट करण्यात आली होती. राजकीय हेतूपोटी गैरसमज पसरविण्यासाठी ही पोस्ट करण्यात आली होती.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

अमझद खान | कल्याण : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांच्या विषयी सोशल मिडियावर चुकीची पोस्ट व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करीत ही पोस्ट करण्यात आली होती. राजकीय हेतूपोटी गैरसमज पसरविण्यासाठी ही पोस्ट करण्यात आली होती.

खासदारांबद्दल चुकीची पोस्ट व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात पोलिस अँक्शन मोडमध्ये
Kaali movie : 'काली' चित्रपटाच्या पोस्टरवर उल्हासनगरात नाराजी, ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी केला निषेध

सध्या राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत दोन गट तयार झाले आहे. दोन्ही गटांचा तेच शिवसैनिक असल्याचा दावा आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Eknath Shinde) यांनी काल कल्याणमध्ये येऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठख कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी शिवसेना शाखेत पार पडली. खासदार निघून गेले. त्यानंतर एक चुकीची पोस्ट खासदार आणि पोलिसांविषयी पसविली गेली.

खासदारांबद्दल चुकीची पोस्ट व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात पोलिस अँक्शन मोडमध्ये
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ यांच्या नावाने ही पोस्ट होती. कोळसेवाडी पोलिसांनी रसाळ यांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. रसाळ यांनी स्पष्ट सांगितले की, पोस्टमध्ये कथीत केलेला प्रकार घडलेला नाही. या पोस्टशी माझा काही संबंध नाही. माझ्या नावाचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, आशा रसाळ यांच्या नावाचा वापर करीत अज्ञात व्यक्तीने ही चुकीची पोस्ट केली आहे. राजकीय हेतूने गैरसमज पसरविण्याचा उद्देशाने ही पोस्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com