Dr Babasaheb Ambedkar Indumill Smarak
Dr Babasaheb Ambedkar Indumill Smarak

शिवसेना ठाकरे गटाने सरकारला धरलं धारेवर, ट्वीटरवर म्हणाले; "बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत मिंधे-भाजप..."

दादर येथील इंदूमील कंपाऊंड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार आहे. २०१८ मध्ये या स्मारकाला मंजुरी मिळाली. पण...
Published by :
Naresh Shende
Published on

Shivsena Tweet On Dr Babasaheb Ambedkar Indumill Smarak : दादर येथील इंदूमील कंपाऊंड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार आहे. २०१८ मध्ये या स्मारकाला मंजुरी मिळाली. त्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. कोरोना काळातही या स्मारकाचं काम सुरु होतं. परंतु, मागील वर्षभरापासून सरकारने स्मारकाच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष्य केलं आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. स्मारकाच्या बांधकामाच्या प्रश्नावरून शिवसेनेनं सरकारला धारेवर धरलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाने ट्वीटरवर काय म्हटलं?

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मारकाबाबत मिंधे-भाजप सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत असून गेले वर्षभर ह्या स्मारकाचे काम रखडले आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे प्रेरणादायी जागतिक दर्जाचे स्मारक दादरमधील इंदूमिल कपाऊंड येथे उभारण्यात येत आहे. २०१८ साली स्मारकाला मंजूरी मिळाली आणि कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.

कराराप्रमाणे कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. अगदी कोरोनासारख्या कठीण काळातदेखील ह्या स्मारकाच्या कामात खंड पडू दिला नव्हता. मात्र गेले वर्षभर स्मारकाच्या कामाकडे सरकारने पुर्णतः दुर्लक्ष केले आहे. एमएमआरडीएच्या आयुक्तांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेणारी बैठकच घेतली नाही, परिणामी कंत्राटदारावर अंकुशच राहिलेला नाही आणि स्मारकाचे काम ठप्प झालेले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com