शिवसैनिकांकडून तमाशा कलावंतांना संगमनेरमधे आर्थिक मदत
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने याच पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये शिवसैनिकांकडून तमाशा कलावंतांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तमाशा कलावंताचे लॉकडाऊनच्या कालावधीत झालेले हाल, अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. याचेच भान शिवसैनिकांनी ठेवत संगमनेरमध्ये ही मदत केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरच्या शिवसैनिकांनी कोणतीही बॅनरबाजी न करता आज तमाशा कलावंताना रघुवर खेडकर यांच्याकडे फुलन फुलाची पाकळी म्हणून 51 हजार रुपयांचा धनादेश सोपवला आहे. खेडकर कुठुंबीयांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचे घेरले होते. यात काही कुटुंबीयाचा मुत्यू देखील झाला होता.
आता याच कुटुंबीयांच्या मदतीला शिवसैनिक धावून जात आर्थिक मदत केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख नानासाहेब खेवरे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संगमनेर तालुका प्रमुख जनाभाऊ आहेर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.