मराठा आरक्षणासाठी दिव्यांग तरुणाचे कळसुबाई शिखरावर उपोषण

मराठा आरक्षणासाठी दिव्यांग तरुणाचे कळसुबाई शिखरावर उपोषण

पैठण येथील शिवाजी गाडे या दिव्यांग तरुणाने महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या सर्वोच्च कळसुबाई शिखरावर उपोषण सुरू केले आहे.
Published by :
shweta walge
Published on

सुरेश वायभट/पैठण; मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून पैठण येथील शिवाजी गाडे या दिव्यांग तरुणाने महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या सर्वोच्च कळसुबाई शिखरावर उपोषण सुरू केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध प्रकारचे आंदोलने सुरू असून अशाच प्रकारचे लक्षवेधी आंदोलन पैठणच्या या दिव्यांग तरुणाने सुरू केले आहे. या दिव्यांग तरुणाने उपोषणासाठी ५४०० फुट उंच असलेल्या कळसुबाई शिखराची निवड करुन रात्रीच्या किर्र अंधारात कडाक्याच्या थंडीत आणि दिवसा रखरखत्या उन्हात शुक्रवार दिनांक २७ ऑक्टोबर ते रविवार दिनांक २९ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस उपोषण करण्यात येणार आसल्याचे उपोषण कर्ते शिवाजी गाडे यांनी लोकशाही न्युजशी बोलतांना सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com