शिवसेना-राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा,काँग्रेसही स्वबळावर

शिवसेना-राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा,काँग्रेसही स्वबळावर

Published by :
Published on

महाविकास आघाडीत काहीतरी बिनसल्याचे चित्र असल्याचे दिसत असताना नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेसलाही स्वबळावर निवडणूक लढावी लागणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर, खुल्या प्रवर्गात या जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.असं असलं तरी निवडणुका झाल्यास त्या स्वबळावर लढण्याचा नारा नंदुरबार जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी दिला आहे. तर तिकडे भाजपने कोणा सोबतही युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रंगत वाढणार आहे

महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस राज्यात एकत्र असले तरी नंदुरबारमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवून आपली ताकद जिल्ह्यात सिद्ध करेल असा विश्वास शिवसेना पक्षाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जिल्ह्यात आपलं गतवैभव प्राप्त करण्यासाठी स्वतंत्र निवडणुकीचा नारा दिला आहे. तर भाजप मात्र निवडणुकांसाठी तयार असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे.निवडणुकीच्या निकालावर नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता कोणाच्या हाती राहील? तर दुसरीकडे महाविकास आघाडी स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्यामुळे मतविभाजनाचा फटका त्यांना बसू शकतो. या प्रश्नांची ही उत्तरं मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com