ramesh bornare and Dilip Walse Patil
ramesh bornare and Dilip Walse PatilTeam Lokshahi

शिवसेना आमदाराच्या त्रासामुळे महिलेने मागितली आत्महत्येची परवानगी

गृहमंत्र्यांना लिहिले पत्र, वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले पत्र
Published by :
Team Lokshahi
Published on

औरंगाबाद | सचिन बडे

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना आमदाराकडून वारंवार मारहाण केली जाते, त्रास दिला जातो, यामुळे

आमदारांच्या त्रासाला कंटाळून महिलेने गृहमंत्र्यांना (home minister Dilip Walse Patil)पत्र लिहून आत्महत्येची परवानगी मागितली आहे.

ramesh bornare and Dilip Walse Patil
पोलिस बदल्यांच्या यादीवर बोगस, वाळू तस्कर, गुड, बरा असा शेरा : काय आहे प्रकार?

आमदार रमेश बोरणारे(ramesh bornare)यांच्या भाऊजईने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवले आहे. जयश्री दिलीपराव बोरणारे त्यांचे नाव आहे. आमदार बोरणारे यांना मारहाण केल्याचा याआधी त्यांनी आरोप केला होता. याबाबत वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले पत्र दिले आहे.

यापुर्वी झाला होता वाद

गावात भाजपच्या शाखेचं उद्घाटनास जाणाऱ्या महिलेस मारहाण केल्याचा आरोप यापुर्वी आमदार बोरणारे यांच्यांवर झाला होता. भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या म्हणून बेदम मारहाण केली, असा आरोप पीडित महिलेने केला होता. तसेच यावेळी त्यांच्या पतीला सुद्धा मारहाण केली असल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com