शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली नितीन गडकरींची स्तुती
मंगेश जोशी | धुळे-सोलापूर महामार्गावर कन्नड (औट्रम) घाटात जवळपास आठ ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे अनेक वाहने या घाटात अडकली असून, सध्या प्रशासनाच्या वतीने हा मार्ग मोकळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी कन्नड घाटाची पाहणी केली. कन्नड घाट अत्यंत धोकादायक असल्याचे मत यावेळी लोकशाही न्यूजशी बोलताना सांगितले.
कन्नड घाट अत्यंत धोकादायक घाट आहे. हा आता सूरू केला तर आताच काही 6 हजार कोटी लागत नाही. जवळपास 2-4 वर्ष लागतील हा घाट तयार व्हायला असे, चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. या घाटाबाबत आम्ही खुप प्रयत्नशील आहोत. आणि निश्चीतपणे नितीन गडकरी यांनी मान्य केले, हे मी करून देतो, ते लवकरात लवकर करतील, असे कौतुक उदगार खासदार चंद्रकांत खैरे यांनी काढले आहेत. तसेच या घाटात नितीन गडकरीसुद्घा 2-4 वेळेस फसले होते, आणि म्हणून त्यांनी मान्य केले असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्घा गडकरींना पत्र लिहले असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली.