महाराष्ट्र
शिवसंग्राम पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार
शिवसंग्राम पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसंग्राम पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती विनायक मेटे बीडमधून विधानसभेसाठी लढतील, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी मंगळवारी दिली.
महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष येत्या निवडणुकीत लोकसभेच्या तीन, तर विधानसभेच्या १२ जागा लढवेल. अशी माहिती आहे.
पुणे येथे संघटन बांधणीसाध पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर होते. या शिबिरानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. ज्योती, प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे पुणे शहराध्यक्ष भरत लगड, लह ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक हिंदूराव जाधव, कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, विनोद शिंदे आदी उपस्थित होते.