Kolhapur : शिवसैनिकांचा मोर्चा अडवला; कार्यकर्ते व पोलिसांत झटापट

Kolhapur : शिवसैनिकांचा मोर्चा अडवला; कार्यकर्ते व पोलिसांत झटापट

पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात
Published on

सतेज औंधकर | कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत माने यांच्या घरावर मोर्चा काढला. परंतु, पोलिसांनी शिवसैनिकांना रस्त्यातच अडवल्याने कार्यकर्ते व पोलिसात झटापट झाली. व पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

Kolhapur : शिवसैनिकांचा मोर्चा अडवला; कार्यकर्ते व पोलिसांत झटापट
Dhairyasheel Mane : कोल्हापुरात शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष पेटणार? खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा

एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदार धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानावर निषेध मोर्चा काढला होता. शाहू मार्केट यार्ड चौक येथून कार्यकर्ते मोर्चाने खासदार माने यांच्या निवासस्थानाकडे निघाले असताना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे उद्यानाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खासदार माने यांच्या निवासस्थानापासून 200 मीटर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त लावला असून बॅरॅकेट्स लावून रस्ता अडवला होता. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व शिवसैनिक यांच्यामध्ये झटापट झाली. पोलिसांनी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत खासदार माने यांचा निषेध व्यक्त केला. याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, संजय पवार, विजय देवणे, रवीकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खासदार माने यांनी पहिल्यांदा खासदार पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुरलीधर जाधव यांनी केली असून खासदार माने यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली आहे, अशा शब्दात जाधव यांनी माने यांच्यावर निशाणा साधला.

Kolhapur : शिवसैनिकांचा मोर्चा अडवला; कार्यकर्ते व पोलिसांत झटापट
'इथे क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकं फोडेन लक्षात ठेवा'

दरम्यान, धैर्यशील माने यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केले. शिवसेनेचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्याने आंदोलन करण्याची त्यांची मानसिकता तयार झाली आहे. या मोर्चात सहभागी होणारे सारे आपलेच बंधूभगिनी आहेत, त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे, त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे हे आपले कर्तव्य आहे, आणि ते आपण पार पाडणार आहे. त्यामुळे समर्थकांनी शांत रहावे, असे माने यांनी आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com