रामदास कदम यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; बॅनरला मारल्या चपला
हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा पनवेलमधील शिवसैनिकांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेना शाखा पनवेल या ठिकाणी रामदास कदम यांच्या पुतळयाचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा केली.
ज्या रामदास कदम यांना तब्बल दोन वेळा शिवसेनेने विधानपरिषद उमेदवारी दिली आणि विधान परिषदेतून पर्यावरण मंत्री पद दिले. रामदास कदम यांच्या मुलाला आमदार केले. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी पोटच्या पोरासारखी काळजी घेतली. त्या रामदास कदम यांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणं.. ही हिम्मत दाखवणं. ही विकृती आहे हा सत्तेचा माज आहे असे शिवसैनिकांनी म्हंटले.
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध नोंदवण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत साहेब, सल्लागार शिरीष बुटाला, पनवेल उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम,विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका प्रमुख संदीप तांडेल, विश्वास पेटकर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर संघटक शशीकांत डोंगरे, उपजिल्हा संघटीका कल्पना पाटील, विधानसभा संघटीका रेवती सकपाळ, शहप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, महिला आघाडी च्या मीना सादरे, संचीता राणे, सानीका मोरे, रुपाली कवले, उज्वला गावडे, पदाधिकारी, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी, पराग मोहिते तसेच शिवसेना, युवासेना व युवतीसेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.