एकनाथ शिंदेंवर टांगती तलवार कायम? शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

एकनाथ शिंदेंवर टांगती तलवार कायम? शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. 11 जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

राज्यपालांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना सरकार स्थापनेसाठी दिलेल्या आमंत्रणाविरोधात आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला आव्हान देणारी याचिका शिवसेनेच्यावतीने आज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. या याचिकेवर 11 जुलै रोजीच सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता राज्याचे लक्ष पुन्हा एकदा 11 जुलैकडे लागले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. जे. के . महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. शिवसेनेच्यावतीनं अॅड. देवदत्त कामत यांनी कोर्टात बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांची निवड, बहुमत चाचणी तसेच १६ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय अद्याप आलेला नसताना सरकार स्थापनच कसं काय झालं? असे मुद्दे यातून मांडण्यात आले आहेत. दरम्यान, ११ जुलै रोजी होणाऱ्या आधीच्या सुनावणीतच या याचिकेवरही सुनावणी करण्याचे निर्देश खंडपीठानं दिले आहेत.

शिवसेनेनं यापूर्वीच १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टानं ११ जुलै रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचं म्हटलं होतं. पण ही सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली. कोर्टाच्या सुनावणी पूर्वीच या सर्व गोष्टी झाल्यानं शिवसेनेनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com