महाराष्ट्र
शिखर बँक गैरव्यवहार प्रकरण; अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणात अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणात अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात आणखीन ५० निषेध याचिका दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२५ हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यावर ३१ ऑगस्टला न्यायालय सुनावणी घेणार आहे. या आधी आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला सप्टेंबर २०२० मध्ये अजित पवार यांना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
यातच आता या रिपोर्टवर आक्षेप घेत काही दिवसांपूर्वीच सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या असल्याची माहिती मिळत आहे.