शरजील उस्मानीचं ट्विट; जालन्यात गुन्हा दाखल
अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने केले ट्विट त्याला चांगलेचे भोवले आहे. कारण त्याच्याविरोधात जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्याच्या येथील अंबड येथे राहणाऱ्या हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते अंबादास अंभोरे यांनी उस्मानीविरोधात तक्रार नोंदवली आहे.
"उस्मानी याने ट्विटरवर केलेल्या काही ट्विटमध्ये भगवान राम यांच्याबद्दल चुकीच्या शब्दांचा वापर केला होता त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या", असल्याचे हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते अंबादास अंभोरे यांनी म्हटले आहे. अंभोरे यांनी हिंदूच्या धार्मिक भावना दुखावणार ट्विट केलं आहे अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती. या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी उस्मानीविरोधात बुधवारी रात्री भारतीय दंड संहिता कलम २९५-अ (धार्मिक भावनांना भडकावणारे द्वेषपूर्ण कृत्य) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण जालना सायबर सेलकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.