Share Market: शेअर बाजर कोसळला, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
जागतिक शेअर बाजरात होणाऱ्या चढ- उत्तरामुळे त्याचा प्रभावमुळे देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण झाल्याचं दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 953 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 311 अंकांची घसरण झालीय.
सेन्सेक्समध्ये 1.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,145 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.79 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,016 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 930 अंकांची घसरण होऊन तो 38,616 अंकावर पोहोचला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या दिग्गज शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दुपारी 11.15 वाजता सेन्सेक्स 1040.1 किंवा 1.79 टक्क्यांनी घसरून 57,058.82 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 346.10 अंकांनी किंवा दोन टक्क्यांनी घसरून 16,981.25 वर होता. त्यानंतर बाजार थोडाफार सावरला. मात्र, अद्यापही मोठी घसरण सुरू आहे. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांचे सुमारे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
Asian Paints- 1.26 टक्के
HCL Tech- 1.21 टक्के
Infosys- 1.08 टक्के
Divis Labs- 0.75 टक्के
UltraTechCement- 0.61 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
Tata Motors- 6.05 टक्के
Hindalco- 5.79 टक्के
Adani Ports- 5.52 टक्के
Maruti Suzuki- 5.44 टक्के
Eicher Motors- 4.69 टक्के