शरद पवार यूपीए अध्यक्ष व्हावे; अजित पवार म्हणाले…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'यूपीए'च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. त्यामुळे पुन्हा एकदा युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान शरद पवार यांच्या नावाच्या चर्चेवर आता मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यूपीए अध्यक्ष व्हावे का यावर मी बोलणार नसल्याचे म्हणत, केंद्रीय विषयावर मी बोलणे योग्य नाही,आमचे इतर नेते यावर बोलतील.तसेच राज्यातील विषयावर मी बोलत असल्याचे सांगत त्यांनी विषय टाळून दिला.
दरम्यान युपीएच्या अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'यूपीए'च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
अनिल देशमुखाच्या चौकशीवर म्हणाले…
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा केली आहे.तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असे ते म्हणाले. तसेच राज्यातील पोलिसांच्या बदल्या व रॅकेटची पू्र्ण माहिती घेऊन, हा कट आहे की वैयक्तिक कारण, या सर्व बाजूने चौकशी करण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.