देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर शरद पवार म्हणाले…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयातील १२५ तासांचे व्हीडिओ फुटेज सादर केले होते. या व्हीडिओजच्या आधारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र, शरद पवार यांनी या सगळ्यासंदर्भात एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला.
विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात जाऊन १२५ तासांचे रेकॉर्डिंग करण्यात यश मिळवल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक करतो. पण १२५ तासांचं रेकॉर्डिंग करण्याची प्रकिया किती दिवस सुरु असेल, हे लक्षात घेतले पाहिजे. अशाप्रकारचे रेकॉर्डिंग शक्तिशाली यंत्रणाच करू शकतात. सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडेच अशा यंत्रणा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
जर एखादा व्यक्ती सार्वजनिक जीवनात काम करत असेल तर त्याच्याविषयी माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. यामुळे मी काही बोलणार नाही तुम्ही याबाबत बघून घ्या. यावर त्यांच्याकडून एवढ कळाले की, मी सांगितलेल्या गोष्टीवर लक्ष घातलं आहे. तसेच अशा गोष्टीमध्ये काळजी घेईल असे म्हणत हा प्रश्न माझ्याबाबत तिथे संपला होता असे शरद पवार यांनी सांगितले आहे. उदाहरण दिलं तर व्यक्तिशा माझा यामध्ये कोणताही संबंध नाही. व्यक्तिशा माझा यामध्ये कोणताही संबंध नाही. आमची एक तक्रार आहे. कुणी तक्रार केल्यावर त्या तक्रारीच्या आधारे नेत्यांना त्रास देणं आणि त्यांना नामशेष करण्यात येत आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात याची अधिक संख्या असल्याचे शरद पवार म्हणाले.
'नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही'
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. ते गेल्या २५ ते ३० वर्षांपासून विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. मग आत्ताच त्यांच्यावर आरोप का होत आहेत? कोणत्याही मुस्लीम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायच, हा प्रकार घृणास्पद असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.