'सरकार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा'
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील घडामोडी ढवळून निघालेले असताना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यानंतर काही क्षणातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यावेळी बैठकीदरम्यान शरद पवार यांनी, सरकार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री कराव लागेल असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.
दरम्यान, या बैठकीदरम्यान, पवार आणि ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागच्यावेळी सरकार वाचवण्यासाठी शरद पवारांची मध्यस्थी यशस्वी ठरली होती. त्यामुळे आताच्या बैठकीत पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होणार आणि राज्यातील अस्थिर झालेले सरकार वाचणार की कोसळणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
फेसबुक संवादाता काय म्हणाले उद्धव ठाकरे
शिवसेना प्रमुख सांगायचे की, शिवसेनेपासून हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. 2014 साली जी शिवसेना लढली त्यातून 63 आमदार निवडुन आली ती बाळासाहेबांची शिवसेना होती. शिवसेना कुणाची, बाळासाहेबांची शिवसेना नाही का, हा प्रश्न महत्वाचा नाही.
मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं आहे, मला समोर येऊन सांगा त्याक्षणी मी मुख्यमंत्री पद सोडतो, तसेच तर आज संध्याकाळपासून माझा मुक्काम वर्षावरुन ‘मातोश्री’वर घेऊन जातो असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी घातली.