हर्षवर्धन पाटलांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट?

हर्षवर्धन पाटलांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट?

हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची उमेदवारी मिळण्याचे संकेत, मात्र उमेदवारीला बड्या नेत्यांचं आव्हान
Published by :
shweta walge
Published on

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्यानं इंदापूरच राजकारण तापलंय. हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची उमेदवारी मिळण्याचे संकेत स्वत: शरद पवारांनी दिलेयत, मात्र त्यांच्या उमेदवारीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी आव्हान दिलंय. दोन दिवसांपूर्वीच नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी परिवर्तन मेळावा घेत उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. तुम्ही तुमचा निर्णय बदला नाही तर देशातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूर तालुक्यात होईल असा थेट इशाराच शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी दिलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com