ईडीचे छापासत्र;शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

ईडीचे छापासत्र;शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

Published by :
Published on

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमागे ईडीचा ससेमीरा लागला आहे. एका मागून एक नेत्यांना ईडीच्या नोटीसा धाडल्या जात आहेत. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीस, भाजपची नुकतीच झालेली जन आशिर्वाद यात्रा या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला महत्त्व आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. उद्या अर्थात मंगळवारी 31 ऑगस्टला ही बैठक होत आहे. उद्या संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या बैठकीत कामकाजाचा आढावा आणि विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणं अपेक्षित आहे. यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व 16 मंत्र्यांचा समावेश असेल.

ईडीने नुकतंच शिवसेना नेते अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे तर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच कार्यालयांवर छापेमारी केली. जरी हे धाडसत्र शिवसेना नेत्यांवर असलं तरी महाविकास आघाडी म्हणून सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र आहेत. त्यामुळे याबाबत राष्ट्रवादीची भूमिका किंवा रणनीती काय असू शकते त्यावर चर्चा होऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com