जीवेत शरद: शतम्; शरद पवार यांचं 82व्या वर्षांत पदार्पण
महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सत्ताधारी महाआघाडीतील नेत्यांपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांनीही शुभेच्छा देताना पवारांच्या नेतृत्वाचे गुणगाण केले आहे.
गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या 11 मुलांपैकी शरद पवार हे एक आहेत. गोविंदराव हे 1940-50 च्या दशकात सहकार क्षेत्रात अग्रणी होते. तर आई शारदाबाई तीन वेळा जिल्हा मंडळाची निवडणूक जिंकल्या होत्या. 1978 ला मुख्यमंत्री बनले तेव्हा शरद पवार फक्त 38 वर्षांचे होते. सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी स्वतः मिळवला. 1983 ला शरद पवार समाजवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून गेले. इथूनच त्यांचं राष्ट्रीय राजकारण सुरू झालं.