‘कोरोना वुहानच्या प्रयोगशाळेतून निघाला मात्र,त्याचा खरा मालक बिल गेट्स’

‘कोरोना वुहानच्या प्रयोगशाळेतून निघाला मात्र,त्याचा खरा मालक बिल गेट्स’

Published by :
Published on


चंद्रशेखर भांगे | कोरोना हा वुहानच्या लॅबोरेटरीतून निघाला मात्र, त्याचा खरा मालक हा बिल गेट्स आहे, अशी बोचरी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे. मेधा पाटकर या आज ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात पुण्यातील कामगार आयुक्तांना भेटायला आल्या होत्या. त्यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी बिल गेट्सवर ही टीका केली आहे.

ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय आणि कायद्यांच्या उल्लंघनाबाबत मेधा पाटकर यांनी सहायक कामगार आयुक्त प्रवीण जाधव यांची भेट घेतली. त्यांना विविध मागण्यांचं निवेदनही दिलं. त्यानंतर पाटकर माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कोरोना ज्या लॅबमधून निघाला त्या लॅबचा मालक बिल गेट्स आहे. बिल गेट्स फाऊंडेशनने पूर्ण जगाच्या शेतीवर कब्जा करण्याचं ठरवलं आहे. स्वतः अमेरिकेतल्या दोन लाख ४० हजार एकराचा मालक असून सुद्धा आणि त्यांना आता केंद्रातले कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलनालासुद्धा दाद न दिल्यामुळे ७१५ शेतकरी शहीद झाले आहेत. त्या तोमरांनी गेट्स यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. तेव्हा हे कॉर्पोरेटायझेशन याला जबाबदार असल्याचे मेधा पाटकर म्हणाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com