कुरुलकरनंतर आणखी एक बडा अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; एटीसकडून अटक
पुणे : डीआरडीओचे संचालक प्रदिप कुरुलकर यांच्या अटकेनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यांला हनीट्रॅप प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. एअरफोर्सचा वरिष्ठ आधिकारी हनीट्र्रॅपमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहे. निखिल शेंडे असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते बंगळुरुत कार्यरत होते. निखिल शेंडे यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानाला दिल्याची माहिती मिळत आहे.
पाकिस्तानी तरुणीने प्रदीप कुरुलकरला हनीट्रॅपमध्ये अडकवून देशातील महत्त्वाची माहिती शत्रुराष्ट्राला पुरवल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एटीएसकडून प्रदीप कुरूलकर यांना अटक करण्यात आली आहे. कुरुलकर यांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची कोठडी एका दिवसाने वाढविण्यात आली आहे. अशातच, एअरफोर्सचे वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे हेही हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. कुरुलकर यांच्या संपर्कात असलेली महिलाच निखिल शेंडे यांच्याही संपर्कात असल्याचे समजते आहे. दरम्यान, निखिल शेंडे यांना एटीएसने ताब्यात घेतले असून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.