महाराष्ट्र
उद्यापासून आपल्या मुलांना शाळेत पाठवा – Rajesh Tope
रवी जैस्वाल, जालना
कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. ओमायक्रॉनचा शिरकाव देखिल झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत आता घट होताना दिसत आहे. यातच आता सोमवारपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत
उद्यापासून आपल्या मुलांना शाळेत पाठवा असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पालकांना केलंय. उद्यापासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु होत आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं काही पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार आहे. मात्र जगाचा अभ्यास करून शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आदेश संस्थाचालकांना देण्यात आले आहेत.
त्यामुळं मुलांना उद्यापासून शाळेत पाठवा असं आवाहन टोपे यांनी केलंय. त्याचबरोबर लसीकरण हे सक्तीचं नसलं तर आरोग्यासाठी ती घेणं भाग पाडू असं टोपे यांनी म्हटलंय.