लसीकरणासाठी स्व:ता जिल्हा शल्यचिकित्सक रस्त्यावर; लसीकरण असेल तरच माजलगाव शहरात एंट्री

लसीकरणासाठी स्व:ता जिल्हा शल्यचिकित्सक रस्त्यावर; लसीकरण असेल तरच माजलगाव शहरात एंट्री

Published by :
Published on

विकास माने | बीड | कोविड लसीकरणासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. बीडच्या माजलगावमध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकास लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर स्व:ता जिल्हा शल्यचिकित्सक रस्त्यावर उतरले आहेत. कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्रत्येक नागरिकांची तपासणी करून लसीकरण बंधनकारक केले जात आहे.

जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी आरोग्य विभागाकडून वारंवार आवाहन केले जात असताना देखील नागरिक आजही पुढे येऊन लसीकरण करत नाही. त्यामुळेच या नागरिकांचं लसीकरण व्हावं, या उद्देशानं आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. येणाऱ्या नागरिकांचे लसीकरण झाले असेल तरच त्यांना माजलगाव शहरात प्रवेश देण्यात येतोय. दरम्यान या वेळी अनेक नागरिकांचे आणि आरोग्य विभागाचे वाद-विवाद देखील होत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com