Omicron Varient | …तर राज्यातल्या शाळा पुन्हा बंद- वर्षा गायकवाड
गेल्या तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा संसर्ग खालावल्यानंतर आता कूठे शाळा सूरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. यासोबतच कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमायक्रॉन प्रादुर्भाव वाढत चालला आहे.त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य पुन्हा शाळा बंद करण्याचा विचार करू शकते असे म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा शाळा बंद होण्याची शक्यता आहे.देशात ओमायक्रॉनची भीती वाढत असताना, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य पुन्हा शाळा बंद करण्याचा विचार करू शकते असे म्हटले आहे.
"ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत," असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.