School Reopen : आरोग्य मंत्र्यांनी दिल्या 'या' महत्वपूर्ण सूचना
रवी जयस्वाल | जालना : राज्यात 15 जूनपासून शाळा (School) सुरु होणार आहेत. कोरोना विषाणूच्या (Corona Virus) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी संस्थाचालकांना महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. तसेच, नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घ्यावे, असे त्यांनी केले आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत भर पडत असल्याने चिंता वाढाली आहे. मात्र आज थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या 15 हजार कोरोनाचे रुग्ण सक्रीय असली तरीही रुग्णालयात गर्दी नाही. सध्या फ्ल्युसारखे लक्षण रुग्णांमध्ये आढळत आहेत, अशी राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, ज्या लोकांचे लसीकरण राहिल त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
रुग्णांची संख्या वाढत असली तरी शिक्षणात कोणतीच गोष्ट आडवी येणार नाही, असे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले आहे. शाळेत मुलांच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावं अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा नियोजित वेळापत्रकारनुसारच सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सर्व काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले आहे. विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. तर, विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू होणार आहे. तर, शाळेत विद्यार्थ्यांना मास्क घालणे अनिवार्य नसेल. तसेच, शाळांसाठीही नवीन एसओपी जारी आली आहे.