School Bus : पनवेल मध्ये स्कूल बस जळून खाक, शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीची ऐसी तैसी 

School Bus : पनवेल मध्ये स्कूल बस जळून खाक, शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीची ऐसी तैसी 

नवीन पनवेल ब्रीज जवळ कांडपिळे CNG pump जवळ शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनाला अचानक आग लागली.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : ५ जुलै रोजी नवीन पनवेल ब्रीज जवळ कांडपिळे CNG pump जवळ शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनाला अचानक आग लागली. काही क्षणात त्या गाडीचा कोळसा झाला आणि व्हिडिओ सोशल मीडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायलर झाली. सुदैवाने त्यात कोणतीही जीविहानी झाली नाही. याबाबत मनसेविसेचे Rto अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप मनसेविसेचे राज्य सचिव अक्षय काशीद यांनी केला.

School Bus : पनवेल मध्ये स्कूल बस जळून खाक, शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीची ऐसी तैसी 
Eknath Shinde : गणेशोत्सवापर्यंत आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोल माफ

याबाबत मनविसेने पनवेलच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी अनिल पाटील उपायुक्त परिवहन पनवेल व गजानन ठोंबरे परिवहन अधिकारी यांनी सदर घटनेची खोलवर तपास करून लवकर शाळा निहाय समिती स्थापन करून नोड प्रमाणे अधिकारी नियुक्त करू असे आश्वासन दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com