Pratik gandhi
Pratik gandhi

पंतप्रधान,मुख्यमंत्र्यांचा ताफा रस्त्यावर; 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत पोलिसांनी केली बदसुलुकी

मुंबईत व्हीआयपी नेत्यांच्या ताफ्यामुळे मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याचे त्याने सांगितले.
Published by :
Published on

मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दाखल झाले होत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) देखील आपल्या कट्टर शिवसैनिक फायर आजीला भेटण्य़ासाठी घराबाहेर पडले होत.या दोन बड्या नेत्यांच्या ताफ्यामुळे संपुर्ण मुंबई वेठीस धरल्याचे चित्र होते. मुंबईकरांना याचा मोठा मनस्ताप झालाच. त्यातच स्कॅम 1992 या प्रसिद्ध वेबसिरीजमध्ये हर्षद मेहताची भुमिका साकारणाऱ्या प्रतिक गांधी (Pratik gandhi) या अभिनेत्याला या नेत्य़ाच्या ताफ्यामुळे मोठा मनस्ताप सोसावा लागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार स्वीकारण्यासाठी माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आले होते. तर त्याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) ८० वर्षांच्या फायर आजी चंद्रभागा शिंदे यांच्या भोईवाडा, परळ या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी निघाले होते. हे दोन्ही बडे नेते आज रस्त्यावरून प्रवास करत असल्याने मुंबईत आज चोख बंदोबस्त होता. दोन्ही नेत्यांची ठीकाण एकाच मार्गावर येत असल्याने, त्यात रविवार असल्याने मुंबईकर देखील बाहेर पडले होते. मात्र या दोन्ही नेत्यांच्या ताफ्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले.

या सर्व दरम्यान स्कॅम 1992 या प्रसिद्ध वेबसिरीजचा स्टारर अभिनेता प्रतिक गांधीला (Pratik gandhi) देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रतिकने ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, मुंबईत व्हीआयपी नेत्यांच्या ताफ्यामुळे मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याचे त्याने सांगितले.तसेच शूटिंगच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी मी रस्त्यांवरून चालत होतो. त्यावेळी पोलिसांनी माझा खांदा पकडून मला जवळच्या गोदामात नेले. काही कारण न सांगता त्यांनी हा प्रकार माझ्यासोबत केला. या घटनेमुळे मी अपमानीत झालो असल्याचे त्य़ांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे अभिनेता प्रतिक गांधी (Pratik gandhi) निराश झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com