Police Vijay Sawant & Students' Burning Bus
Police Vijay Sawant & Students' Burning BusTeam Lokshahi

शाळकरी मुलांच्या चालत्या बसने घेतला पेट; सातारा पोलिस बनले सिंघम!

सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले 21 शाळकरी मुलांचे प्राण.
Published by :
Vikrant Shinde
Published on

प्रशांत जगताप | सातारा: सातारा शहरानजीक असलेल्या खावली गावानजीक एका शाळकरी बसने अचानक पेट घेतला. ही बस सातारा येथील एका खाजगी शाळेतील मुलांना घेऊन कोरेगावच्या दिशेनं चालली होती. चालत्या बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यानं पेट घेतला.

Police Vijay Sawant & Students' Burning Bus
सातारा पोलिस दलात खळबळ; सहायक पोलिस उपनिरीक्षकाची 2 वर्षांसाठी पदावनती करून त्यांना पुन्हा हवालदार केलं

ही बाब ड्युटी संपवून गावी चाललेल्या सातारा पोलिसाच्या निदर्शनात आल्याने त्यांनी बस चालकाला बस थांबण्याची विनंती केली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता बसमधील मुलांना त्यांच्या शालेय साहित्यासह सुखरूप बाहेर काढलं.

या बसमधून 21 मुलं घरी जात होती. सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली आहे. बसने अचानक पेट घेतल्यानं धुराचे लोट निर्माण झाले होते. रस्त्यावरून जाणारे प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येनं जमा झाले. पोलिसाने स्थानिकांच्या मदतीने पेटलेली स्कूल बस विझवल्याने पोलिसाचे आभार मानण्यात आले असून या आगीत बसचे नुकसान झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com