साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील कोरोना पॉझिटीव्ह

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील कोरोना पॉझिटीव्ह

Published by :
Published on

प्रशांत जगताप, सातारा | सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. श्रीनिवास पाटील यांनी फेसबूक पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान श्रीनिवास पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेत कोरोना चाचणी करावी असे आवाहनही खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com