महाराष्ट्र
ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; डॉ. अजय तावरेचे 5 जिल्ह्यांत दलाल असल्याची माहिती
ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात डॉ. अजय तावरेचे 5 जिल्ह्यांत दलाल असल्याची माहिती मिळत आहे.
ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात डॉ. अजय तावरेचे 5 जिल्ह्यांत दलाल असल्याची माहिती मिळत आहे. डॉ. तावरेचे पश्चिम महाराष्ट्रात दलाल असल्याची माहिती समोर आली आहे.
शस्त्रक्रिया करायला ससूनमध्ये वेटींग असते. मात्र तावरे याला जर संपर्क साधला तर वेटिंगसाठी थांबावे लागत नाही, त्यासाठी हे दलाल काम करत असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे पोलिसांकडे विविध जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्या आहेत. ससून रुग्णालयात चांगली आणि लवकर उपचार मिळावे यासाठी हे दलाल तावरेशी संपर्क करत होते.