‘सारथी’चं आंदोलन पुन्हा पेटणार? तारादूतांनी सामुहिक आत्मदनाचा इशारा

‘सारथी’चं आंदोलन पुन्हा पेटणार? तारादूतांनी सामुहिक आत्मदनाचा इशारा

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यात गेल्या महिन्यात सारथी संस्थेच्या बाहेर तारादूतांना नियुक्त्या मिळाव्यात, या मागणीसाठी तारादूतांनी आंदोलन केलं होतं. आंदोलनावेळी सारथीची चौकशी लवकर करून तारादूतांना नियुक्त्या देऊ, असं सांगण्यात आलं होत. परंतु आता तारादूतांनी आंदोलनाचा संयम संपला असून १५ फेब्रुवारीपासून तारादूतांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलाय. सारथी संस्थेनं चर्चेच निमंत्रण देऊनही तारदूतांनी धूडकावत लावत चर्चा नको निर्णय घ्या असा थेट इशारा दिला आहे. बुधवारी (आज ) संचालक मंडळाची बैठक झाली, मात्र आजच्या बैठकीतही कोणता तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील तारादूत १५ फेब्रुवारीला पुण्यात येणार आहेत. शिवजयंतीच्या दिवशीच तारादूतांनी सामुहिक आत्मदनाचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने सारथी संस्थेसाठी १३० कोटी रुपये मंजूर केले. परंतु प्रत्यक्षात अवघे 31कोटी रुपये दिले गेले. त्याच प्रमाणे तारादूतांच्या नियुक्त्यांचा प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे. सारथी संस्थेचे अधिकार कोणाकडे आहेत ? असे म्हणत तारादूत आक्रमक झाले आहेत. तारादूतांचे हे पहिले आंदोलन नसून १५ फेब्रुवारीपासून सुरू होणारं तारातूदांच हे वर्षातलं तिसरं आंदोलन आहे.

एकीकडे सारथीला १३० कोटी रुपये देऊन मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सरकार करतंय मात्र तारादूतांच्या बाबतीत सारथी.आणि राज्य सरकारही उदासीनाय त्यामुळे सारथीच्या निधीचा फक्त. देखावा का ? हा सवाल आता तारादूत विचारायला लागले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com