Sanjay Raut : राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत, राज्यात काय चालले आहे ते समजून घ्यायला त्यांना थोडावेळ लागेल

Sanjay Raut : राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत, राज्यात काय चालले आहे ते समजून घ्यायला त्यांना थोडावेळ लागेल

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत. बराचकाळ ते परदेशात होते. त्याच्यामुळे राज्यामध्ये काय चालले आहे ते समजून घ्यायला त्यांना थोडावेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजी यांना बिनशर्ट पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला होता म्हणजे काही महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शाहांचा जन्म झाला आहे.

ज्या मोदी शाहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असे ते म्हणाले होते, त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला यातच सगळं आले आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलतं. ते 288, 225 काय ते जागा लढणार आहेत. हे आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का? हे पाहावं लागेल.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्याविरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी नव्हे इतकं मोठे यश मिळवलं आहे. हे पक्ष टिकल्याचे लक्षण आहे. कार्यकर्ते जागेवर असल्याचे लक्षण आहे. 8 लोकसभेच्या जागा जिंकणं माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही लहान गोष्ट नाही त्याचप्रमाणे आमचाही पक्ष शिवसेना ताकदीने उभा आहे आणि आम्ही 9 जागा जिंकलो. या राज्याचा त्यांना खूप अभ्यास करावा लागेल. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com