Sanjay Raut : पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी, महाराष्ट्रातला पूर दिसत नाही का?

Sanjay Raut : पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी, महाराष्ट्रातला पूर दिसत नाही का?

राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, या बजेटमध्ये पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी, पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी रुपये देण्यात आले. माझा प्रश्न आहे या सरकारला, अर्थमंत्र्यांना आणि जे बजेटची वाहवा करत आहेत.

पुराचा सामना करण्यासाठी बिहारला18 हजार कोटी दिले जात आहेत, त्यांना महाराष्ट्रातला पूर दिसत नाही का? पुराचा सामना करण्यासाठी बिहारला18 हजार कोटी रुपये दिलेत आम्हाला निदान 1 हजार कोटी तरी द्या. हे सांगण्याची हिंमत ज्या सरकारमध्ये नाही त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्च्या उबवू नयेत असे माझं स्पष्ट म्हणणं आहे. बिहारला एक न्याय. बिहारला मिळालं पाहिजे. बिहार आमच्या देशाचा भाग आहे. पण त्याचप्रकारची पूरस्थिती, पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रातसुद्धा आहे.

यासोबतच ते म्हणाले की, महाराष्ट्राला या नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी एक दमडाही मिळाला नाही. त्याच्यावरती आता जे पेन, पेन्सिल घेऊन बसले होते बजेट पाहायला आमचे उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांचे काय म्हणणं आहे त्यांनी सांगावं. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com