Sanjay Raut : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि ही भाषा करुन दाखवावी
पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले की, आता आदेश नाही, मैदानात उतरा अन् ठोकून काढा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा, ही कुठली भाषा आहे. एका गुंडाची भाषा तुम्ही वापरत आहात. या राज्यात कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. गुंडगिरी सुरु आहे, चोऱ्यामाऱ्या सुरु आहेत. महिलांवर अत्याचार सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही. अमित शाहांची पुण्यातली भाषा आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून केलेली भाषा. गृहमंत्री राजीनामा द्या. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि ही भाषा करुन दाखवावी. तुमच्यात दम असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवा आणि या. मग आम्ही बघतो. असे संजय राऊत म्हणाले.