Sanjay Raut and Devendra Fadnavis
Sanjay Raut and Devendra Fadnavisteam lokshahi

Rajya Sabha Election : भाजपाच्या विजयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया...

"राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया किचकट असते. ज्यांना विजय मिळाला त्यांचं अभिनंदन".
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

राज्यसभेसाठीच्या (Rajya Sabha Election ) सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. यामध्ये भाजपाचे (BJP) दोन, शिवसेनेचे (Shivsena) एक, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) प्रत्येकी उमेदवाराने विजय मिळवला. सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहिले होते.

याचपार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रीया दिली असून, "कोणाचा पराभव झाला? पहिल्या पसंतीची सर्वाधिक मत संजय पवार यांना पडली. पण मोठा विजय झाला, हे चित्र उभं केलं जातंय. काही अपेक्षित मत आम्हाला पडली नाहीत, ते आम्हाला माहीत आहे. पण राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया किचकट असते. ज्यांना विजय मिळाला त्यांचं अभिनंदन".

"आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले त्यांच्याकडे गेले नाहीत. काही अपक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांची व्यूहरचना उत्तम होती. एक जागा त्यांनी जिंकली. माझं एक मत त्यांनी बाद करायला लावलं. निवडणूक आयोगाने त्यांनाच प्राधान्य दिलं", असं मत पराभवानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com