sanjay Raut : सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही; शिंदे गटाविरुद्धच्या न्यायालयीन लढाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात ज्या प्रकारे एक बेकायदेशीर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला ते पाहता हे सरकार लादलं आहे. सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. या देशाची न्यायव्यवस्था कायदा आणि घटना त्यावर विश्वास ठेऊनच आम्ही आजपर्यंत काम करत राहिलो आहोत. ज्याप्रकारे या राज्यामध्ये शिंदे गट-भाजप असं बेकायदेशीर सरकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. यासाठी राजभवनाचा वापर करण्यात आला आहे. विधीमंडळाचा वापर करण्यात आला. या सगळ्या अन्यायाविरोधात शिवसेना महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही खिशात असू शकत नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने लागणार आहे, आमच्या खिशात सुप्रीम कोर्ट आहे, अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत.
देशातील न्यायव्यवस्था त्यांची गुलाम आहे का असा सवाल त्यांनी केला. न्याय व्यवस्था कोणाची बटीक राहू शकत नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही राऊत यांनी सांगितले.