Sanjay Raut | लोकशाही मराठीवर 30 दिवसांच्या बंदीची कारवाई, संजय राऊत म्हणाले...
लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीसारख्या वृत्तवाहिनीवर सत्य दाखवल्याबद्दल लोकशाही चॅनेलवर बंदी घालून केंद्र सरकारने आपल्या हुकूमशाहीची शिंग दाखवली असतील तर त्याचा निषेध देशातल्या प्रत्येक मीडियाच्या घटकानं, वृत्तपत्राने केला पाहिजे.
तसेच ज्या पद्धतीने ही कारवाई केली. या कारवाईचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो. सत्य दाखविण्याचा प्रयत्न लोकशाही मार्गाने लोकशाही वृत्तवाहिनीने केला तर तुम्ही लोकशाही वृत्तवाहिनीचा गळा घोटत आहात. आम्ही सगळे लोकशाही म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही बरोबर आहोत. असे राऊत म्हणाले.