Sanjay Raut : 'बाळासाहेब आज असते तर शिवसेना सोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना खास शैलीत उत्तर दिलं असतं'

Sanjay Raut : 'बाळासाहेब आज असते तर शिवसेना सोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना खास शैलीत उत्तर दिलं असतं'

काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले आणि बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरू असल्याचं सांगतात. अशा लोकांना आज बाळासाहेब हयात असते तर त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं असतं,' असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरू पौर्णिमेचं निमित्त साधत बाळासाहेबांच्या विचारांशी कधीच प्रतारणा करणार नाही, असं ट्वीट केलं. या ट्वीटमधून शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी एकनाथ शिंदेंवर पलटवार केला आहे.

Sanjay Raut : 'बाळासाहेब आज असते तर शिवसेना सोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना खास शैलीत उत्तर दिलं असतं'
Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतला रिया चक्रवर्तीनेच ड्रग्ज अ‍ॅडिक्ट बनवलं; NCB नं सादर केले आरोपपत्र

'काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले आणि बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरू असल्याचं सांगतात. अशा लोकांना आज बाळासाहेब हयात असते तर त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं असतं,' असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांचे गुरू होते. ज्यांची ज्यांची शिवसेनेवर, महाराष्ट्रावर आणि देशावर निष्ठा आहे त्या सगळ्यांचे गुरू बाळासाहेब होते. एकनिष्ठेने त्यांच्यासोबत राहणं हीच खरी गुरुदक्षिणा, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com