"...या मला अटक करा!"; संजय राऊतांचे ईडीला आव्हान

"...या मला अटक करा!"; संजय राऊतांचे ईडीला आव्हान

मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारला हादरे बसत असतानाच आता शिवसेने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. पत्राचाळ प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळेच आधीच सत्तासंघर्षामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतही आता ईडीच्या या समन्समुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी ट्विटकरून ईडीला आव्हान केले आहे.

"...या मला अटक करा!"; संजय राऊतांचे ईडीला आव्हान
शिंदेंकडील खाते सुभाष देसाईंकडे; मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!

"...या मला अटक करा!"; संजय राऊतांचे ईडीला आव्हान
महाविकास आघाडी सरकार कोसळणार? शिंदे गटाच्या याचिकेत आमदारांनी पाठिंबा काढल्याचा दावा

ई़डीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता.

या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com